जिल्हा परिषद च्या योजना जानेच्या उंबऱ्या पर्यंत पोहचवणार – श्री अमरसिंह पाटील
बांबवडे : जिल्हा परिषदेच्या सर्व योजना माझ्या शाहुवाडी तालुक्यातील तथा सरूड जिल्हापरिषद मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहचवणे, हे माझे कर्तव्य राहील. यासाठी मला आपल्या सेवेची संधी द्या, असे मत सरूड जिल्हापरिषद मतदारसंघाचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार श्री अमरसिंह पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.
यावेळी ते पुढे म्हणाले कि, सरूड जिल्हा परिषद मतदारसंघात शासनाच्या जनतेसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचवणे, हे माझे ध्येय आहे. आपल्या भागातील जनता साधी आहे. त्यांना या योजना माहित देखील नसतात. आपण दिलेल्या संधीच्या माध्यमातून आपल्या उंबऱ्या पर्यंत या योजना पोहचवणे, हा माझा ध्यास राहील. आपण इतरांप्रमाणे कागदावरच्या योजना कंत्राटासाठी निर्माण केलेला आपला विकास असणार नाही. आपला विकास म्हणजे सामान्य जनतेचा सर्वांगीण विकास असणार आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणाऱ्या सवलती या त्यांच्यापर्यंत निश्चितच पोहचतील, त्यात दुजाभाव राहणार नाही.
तरुणांसाठी अभ्यासिका , तसेच क्रीडा विभागाच्या माध्यमातून छोटेखानी क्रीडासंकुल उभे करण्याचा माझा मानस आहे. ज्या माध्यमातून जे तरुण पोलीस भरती, सैन्य भरती साठी प्रयत्न करीत रस्त्यावरून पळण्याचा सराव करतात, त्यांना त्याचा फायदा होईल. अशा अनेक योजनांचा आराखडा तयार आहे. यासाठी तुमचा विश्वास आणि तुमाची साथ गरजेची आहे. आपण आपले मतदान माझ्या नावासमोरील मशाल चीन्हासामोरील बटन दाबून मला आपली सेवा करणेची संधी द्यावी. तसेच सरूड पंचायत समिती साठी डॉ.सौ धनश्री पाटील यांच्या मशाल चिन्हासमोरील बटन दाबून त्यांनादेखील आपल्या सेवेची संधी द्यावी, असे आवाहन श्री अमरसिंह हंबीरराव पाटील यांनी केले आहे.
