जिल्हा बँकेसाठी रणवीरसिंग गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल
बांबवडे : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक ,कोल्हापूर ची निवडणूक लागली असून, यासाठी उदय साखर चे संचालक व युवा नेते रणवीरसिंग गायकवाड यांनी सेवा संस्था गटातून उमेदवारी अर्ज भरला असून, जिल्हापरिषद साठी त्यांची उमेदवारी असल्याचे समजत असतानाच , त्यांनी जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज भरल्याने तालुक्यातील राजकारणाचे वेगळे फासे पडताहेत काय ? हे पहाणे गरजेचे ठरत आहे.

दि.१ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांचे चिरंजीव रणवीरसिंग गायकवाड यांनी बँकेसाठी ,सेवा संस्था गटातून अर्ज दाखल केला आहे. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्यासह शाहुवाडी पंचायत समिती चे सदस्य, तसेच उदय साखरचे संचालक मंडळ , कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाहुवाडी तालुक्यातील एकंदरीत परिस्थिती पाहता, जिल्ह्यातील पालकमंत्री सतेज पाटील यांची झालेली बिनविरोध निवडणूक पार्श्वभूमीवर, बँकेची निवडणूक सुद्धा बिनविरोध झाल्यास नवल वाटू नये. कारण सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाने कूस बदलली असून, नक्की राजकारण कोणत्या दिशेला वळेल , हे कोणालाच सांगता येत नाही.

दरम्यान भविष्यातील बांबवडे जिल्हापरिषद मतदारसंघाचे भावी उमेदवार म्हणून रणवीरसिंग गायकवाड यांच्याकडे पाहिले जात आहे. ,तसेच जिल्हा बँकेसाठी प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांची उमेदवारी गृहीत धरली जात होती. परंतु अचानक झालेल्या अनेक राजकीय बदलामुळे रणवीरसिंग गायकवाड यांची बँकेसाठी सुद्धा उमेदवारी भरल्याने भविष्यात तालुक्यातील राजकारण बदलणार असल्याची हि लक्षणे आहेत.