जिव्हाळ्याच्या माणसाला आपुलकीच्या शुभेच्छा- बोरगे पैलवान यांना सामान्य जनतेच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
बांबवडे : सामान्य कार्यकर्त्यातून निर्माण झालेलं एक नेतृत्व म्हणजे जिल्हा परिषद सदस्य विजयराव बोरगे पैलवान हे होय. त्यांचा आज वाढदिवस संपन्न होत आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त विक्रम पाटील , वींद्र पाटील व हर्षवर्धन पाटील व सहकारी यांनी त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दिल्या आहेत.

कोविड च्या काळापासून त्यांनी घेतलेले कष्ट हे जनता विसरलेली नाही. त्यांना त्यांचे नेते मानसिंगराव गायकवाड यांनी जि.प. ची संधी दिली, आणि बोरगे पैलवान यांनी त्या संधीचं सोनं केलं. मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबातील ते एक सदस्य बनले. परंतु मानसिंग दादा यांच्याविषयी त्यांची कृतज्ञता आजही तशीच आहे.

त्यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करताना, तालुक्यातील ऐतहासिक घटनांना सुद्धा स्पर्श केला. भाडळे तालुका शाहुवाडी हे गाव डोंगराच्या कुशीत असलेलं गाव आहे. १९४७ साली ‘ गाव एक पाणवठा ‘ संकल्पना राबवीत असताना, हरिजन समाजात हि विहीर होती. गळ्यापर्यंत गाळाने भरलेल्या या विहिरीला त्यांनी पुनर्जीवित केलं. त्याचबरोबर सुशोभीकरण केलं. छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून,त्यांनी समाजात त्याकाळी असलेला भेदा-भेद छत्रपती शाहू महाराजांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्या घटनेला बोरगे पैलवान यांनी स्वनिधीतून नुतनीकरण केले. गाळ काढला. आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. अशी अनेक विकास कामे त्यांनी आपल्या मतदारसंघात राबविली आहेत.

मतदारसंघाच्या दक्षिणेला असलेली पाच गावे नेहमीच अनवधनाने दुर्लक्षित राहतात. परंतु विजयराव बोरगे यांनी या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गावांना देखील न्याय देण्याचा यशस्वी निर्णय घेतला. त्यांनी त्या गावात असलेल्या अंधाराला कायमची तिलांजली देण्यासाठी हायमॅक्स चे दिवे बसविले. आणि त्यांना प्रकाशमान रात्र देण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

जि.प.स. बोरगे पैलवान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वराज्य प्रतिष्ठान च्या वतीने गरजू दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत.
अशा अनेक विकास कामांच्या माध्यमातून हा ” आपला माणूंस ” सर्व सामान्य जनतेच्या रुदायात कधी विराजमान झाला, हे जनतेला देखील कळले नाही. त्यांनी केलेलं कोविड काळातील काम, प्रत्येक गावात अडलेली विकासकामे, अचानक ओढवलेल्या अनेक पूर , भूस्खलन सारख्या घटना असो , कि अपघात असो बोरगे पैलवान सगळ्यात अगोदर पोहचलेले जनतेने पाहिले आहे. म्हणूनच हि व्यक्ती सर्व सामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत होवून बसली आहे. अशा या जिव्हाळ्याच्या आपल्या माणसाला सामान्य जनतेने मनापासून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या आहेत. इथं जागा अपुरी पडेल, त्याच अनुषंगाने कोणाचे नाव लिहिलेले नाही. परंतु जिव्हाळ्याच्या माणसाला आपुलकीच्या शुभेच्छा,त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांनी दिल्या आहेत.