जि.प. व पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर
बांबवडे : आज जिल्हापरिषद व पंचायत समिती गट व गणाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. शाहुवाडी तालुक्यात वकून पाच गट तर दहा गण आहेत.

यापैकी जिल्हापरिषद गट पुढीलप्रमाणे :
१. शित्तूर तर्फ वारुण – सर्व साधारण प्रवर्ग २. सरूड अनुसूचित जाती प्रवर्ग , ३. बांबवडे -सर्व साधारण प्रवर्ग ४. सावे -सर्व साधारण महिला प्रवर्ग , ५. येळवण जुगाई – सर्वसाधारण महिला प्रवर्ग .

पंचायत समिती गण पुढीलप्रमाणे :
१. शित्तूर तर्फ वारुण- अनुसूचित जाती प्रवर्ग, २. करुंगळे – सर्व सधारण महिला प्रवर्ग , ३. भेडसगाव – सर्वसाधारण प्रवर्ग, ४. सरूड- सर्वसाधारण प्रवर्ग, ५. बांबवडे – सर्वसाधारण महिला प्रवर्ग , ६. साळशी – सर्वसाधारण प्रवर्ग, ७. सावे – नागरिकांचा मागास प्रवर्ग, ८. आंबर्डे- नागरिकांचा महिला मागास प्रवर्ग, ९. येळवण जुगाई – सर्वसाधारण महिला प्रवर्ग, १०. सोनुर्ले – सर्वसाधारण महिला प्रवर्ग.
अशा प्रकारे आरक्षण सोडत झाल्या असून, आत्ता राजकीय रणसंग्रामा चे बिगुल वाजले आहे. .