educationalसामाजिक

जुगाई हायस्कूलचा निकाल १०० %: धनगर वाड्यावरचा कस्तुरे प्रथ

येळवण जुगाई ( एस.टी.लष्कर ) : जुगाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येळवण जुगाई तालुका शाहुवाडी ने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यामध्ये विशेष प्राविण्य १७, प्रथम श्रेणी ८, द्वितीय श्रेणी ८, तर पास ३ मध्ये यश संपादन केले आहे. यामध्ये प्रथम क्रमांक कुमार कस्तुरे वैभव नथुराम ९२ %, द्वितीय क्रमांक कुमारी नारकर शर्वरी गणेश ९१.६०%, तृतीय क्रमांक कुमारी बोडके सारिका विठ्ठल ९०.६०%, चतुर्थ क्रमांक पाटील वेदांत संदीप ८८.८०%, पाचवा क्रमांक बाऊदने गीता बिरू ८६.६० % असा दहावी चा निकाल लागला आहे.
बारावी चा निकाल ( कला शाखा ) ९४.२८ % लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक सानिका रवींद्र चव्हाण ७७.६७ %, द्वितीय क्रमांक गुरव दीक्षा रामचंद्र ७६.६७ %, तृतीय क्रमांक शेळके मयुरी रामचंद्र ७६.१७ %, चतुर्थ क्रमांक सोष्टे प्रिया कृष्णा ७६.१७ %, पाचवा क्रमांक वारे प्रज्ञा आनंद ७५.३३ % . या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार श्री बाबासाहेब पाटील सरुडकर , माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर, युवराज पाटील सरुडकर, तसेच विद्यालयाचे प्राचार्य ए.जी. कांबळे, सर्व शिक्षकवृंद , प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व शाळा व्यवस्थापन समिती आदींचे मार्गदर्शन लाभले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!