जुन्या रूढींना फाटा देत, विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स कीट चे वाटप- गामाजी ठमके
बांबवडे : जुन्या रूढींना फाटा देवून, नवीन उपक्रम हाती घेवून, ठमकेवाडी येथील गामाजी ठमके यांनी नवीन पायंडा पाडला आहे. त्यांनी विद्यामंदिर ठमकेवाडी येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स कीट चे वाटप केले आहे.
गामाजी शामराव ठमके हे गोगावेपैकी ठमकेवाडी येथील कायमचे रहिवाशी आहेत. त्यांची आई स्व. नकुबाई शामराव ठमके यांचा २१ वा स्मृतिदिन संपन्न झाला. या अनुषंगाने प्रतिवर्षी भोजन यासहीत इतर विधींचा कार्यक्रम होत राहायचा. परंतु या वर्षी या रूढींना त्यांनी फाटा दिला. आणि आपल्या गावातील विद्यार्थी खेळात निपुण व्हावेत, या अनुषंगाने प्राथमिक पायरी म्हणून त्यांनी २१ विद्यार्थ्यांना खाऊ व क्रीडा गणवेशाचे वाटप केले. निश्चितच हा स्तुत्य उपक्रम आहे. त्यांच्या या उपक्रमाचे समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी बाजीराव नाथाजी माने,यांच्यासहित ग्रामस्थ उपस्थित होते.