ज्येष्ठ पत्रकारांनी लस घ्यावी – मुकुंद पवार
बांबवडे : पत्रकारांना सुद्धा फ्रंट लाईन मध्ये गृहीत धरण्यात यायला हवे होते. परंतु पत्रकार स्वत:साठी कधीच काही करत नसतात. आज ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला.
यामध्ये साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज चे संपादक मुकुंद पवार यांना या वयोगटात लस देण्यात आली. यावेळी बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील, जि.प.स. विजयराव बोरगे, आणि आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.