टी.एस. काका म्हणजे सहकार क्षेत्रातील भीष्माचार्य -संजय तळप
बांबवडे: टी.एस. काका म्हणजे सहकार क्षेत्रातील भीष्माचार्य म्हटल्यास वावगे ठरू नये. अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. असे मत श्री संजय तळप यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले कि, टी एस. काकांनी संस्थेला आपल्या लेकरांप्रमाणे मानले. आणि म्हणूनच संस्था आज नावारूपाला आली. श्री महालक्ष्मी नागरी पतसंस्था , श्री महालक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ या दोन्ही संस्था काकांचा आत्मा आहेत. म्हणूनच त्यांच्याविषयी बोलताना असे म्हणावेसे वाटते कि, स्वच्छ चारित्र्य , उत्तम नेतृत्व,
उज्वल ज्याचे कर्तुत्व,
उदार अंत:करणाचे दातृत्व,
मित्रासारखे पितृत्व, रामासारखे पावित्र्य , असणाऱ्या आमच्या टी.एस.काकांना पासष्टी च्या पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा. असे मत केंद्रीय प्राथमिक शाळा करंजफेण चे मुख्याध्यापक श्री संजय सदू तळप यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.