डॉ. अफजल देवळेकर यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव
बांबवडे : डॉ. अफजल देवळेकर सरकार कडवे तालुका शाहुवाडी यांचा राज्याचे राज्यपाल महामहीम भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ” समाज रत्न ” पुरस्कार देवून राजभवन इथं गौरविण्यात आले. अशी माहिती डॉ. देवळेकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

डॉ. अफजल देवळेकर हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमी सहभाग असतो. तसेच विधानसभा, महानगर पालिका च्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.

अशाच अनेक सामाजिक उपक्रमांबद्दल ७ मार्च २०२२ रोजी त्यांचा सन्मान महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते संपन्न झाला.