डॉ.एल.एस. पाटील यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी पंचक्रोशी, हि कर्मभूमी असलेले सीपीआर चे माजी शल्यचिकीत्सक डॉ. एल.एस. पाटील यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज दि.२८ जून रोजी निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स, एसपीएस न्यूज च्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
डॉ. एल.एस पाटील यांची बरीचशी कारकीर्द बांबवडे पंचक्रोशीतील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देण्यात व्यतीत झाली. त्यानंतर त्यांनी सीपीआर चे शल्यचिकीत्सक म्हणून काम पाहिले. आपल्या निवृत्तीनंतर ते आपल्या मूळ गावी म्हणजे चावरे तालुका हातकणंगले इथं स्थायिक झाले. आज दुपारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले.