डॉ.तांबोळी यांची मुंबईत आयुर्वेदिक सेवा २७ जुलै रोजी तसेच प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी
बांबवडे : कोल्हापूर येथील कांकायान आयुर्वेदिक रुग्णालयाचे डॉ. दिलखुष तांबोळी यांची मुंबईत सेवा येत्या २७ जुलै २०२५ रोजी सुरु होत आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी हि सेवा फिनिक्स हॉस्पिटल मध्ये देण्यात येणार आहे. डॉ. तांबोळी त्यांच्या पत्नी डॉ. वहिदा तांबोळी यांची विविध आजारांवर आयुर्वेदिक सेवा बोरीवली पूर्व येथील चिकूवाडी मधील फिनिक्स हॉस्पिटल मध्ये हि सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ.तांबोळी दाम्पत्य गेली २५ वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहेत. वंध्यत्व , पॅरॅलिसीस,मणक्यांचे आजर तसेच मधुमेह यासारख्या अनेक आजारांवर आयुर्वेदिक उपचार करतात. डॉ.वहिदा तांबोळी या वंध्यत्व यावर उपचार देणार आहेत. हे उपचार आयुर्वेदिक असणार आहेत.
कोल्हापूर, बांबवडे याठिकाणी सध्या ते आपली सेवा पुरवत असून, येत्या २७ जुलै पासून ते हीच सेवा मुंबईत देखील देणार आहेत. डॉ. दिलखुष तांबोळी हे एमडी गोल्ड मेडलीस्ट आहेत. त्यांना २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवाचा शाहुवाडी तालुकयासह कोल्हापुरातील मुंबईस्थित जनतेने लाभ घ्यावा , असे आवाहन देखील डॉ. तांबोळी यांनी केले आहे.