डोंगराळ भागात कोरोना विषयी जनजागृती :विजयसिंह पाटील
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील डोंगराळ भागात जावून बाहेरच्या राज्यातील मजुरांना कोरोना विषयी माहिती देवून जनजागृती करण्याचे काम विजयसिंह पाटील यांनी केले, अशी माहिती त्यांनी स्वत: एसपीएस न्यूज शी फोन वरून बोलताना दिली. ते शाहुवाडी पोलीस ठाण्यातील महिला सहाय्य कक्षातील समुपदेशक ( महिला बालविकास विभाग कोल्हापूर ) आहेत.
विजयसिंह पाटील यांनी तालुक्यातील गोंडोली, विरळे, थावडे, शित्तूर वारुण येथील राघूचा धनगरवाडा आदी गावात रोजगार करण्यासाठी आलेल्या मजुरांना कोरोना विषयी माहिती दिली. त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांना वारंवार साबणाने हात धुणे,रस्त्यावर थुंकू नये, खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरणे, आदी गोष्टी समजून सांगितल्या.
यावेळी गावाचे पोलीस पाटील भोसले, पवार व समूह्देशक सौ.सोनाली लगारे उपस्थित होत्या. अशीही माहिती विजयसिंह पाटील यांनी दिली.