डोणोली च्या यशवंत इंग्लिश अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचे चित्रकला परीक्षेत भरघोस यश
बांबवडे : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२२ मध्ये झालेल्या चित्रकला ग्रेड परीक्षेत शाहुवाडी तालुक्यातील यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी डोणोली च्या विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवत, सात पैकी सहा विद्यार्थी बी व सी ग्रेड मिळवत उत्तीर्ण झाले आहेत. अशी माहिती प्राचार्य सचिन जद सर यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रति वर्षी ६ वी ते१० वी च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला ग्रेड परीक्षा होते. यामध्ये इलीमेंटरी व इंटरमेजिएट परीक्षांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे १० वी च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये ७, ५, व ३ याप्रमाणे ग्रेड नुसार वाढीव गुण दिले जातात.

यंदा यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी डोणोली च्या विद्यार्थ्यांनी आपली चमक या परीक्षेमध्ये दाखविली आहे. इयत्ता १० चे ७ पैकी ६ विद्यार्थी या वाढीव गुणांसाठी लाभार्थी ठरले आहेत. यासाठी शिक्षकवृंद व पालकांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेकडून इथं विविध उपक्रम राबविले जातात. याला अनुसरून सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले गेले. त्या बरोबर त्यांच्यामधील नवनिर्मितीला वाव देण्यासाठी प्ले ग्रुप पासून ५ वी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये रंग भरण स्पर्धा आयोजित केल्या . यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने उत्स्फूर्त सहभाग घेतला.

आपल्या शाळेत मल्लखांब, कुस्ती, नृत्य, गायन, वादन, मर्दानी खेळ, मैदानी खेळ, स्केटिंग, उत्कृष्ट शिक्षण, विविध खेळ, मनोरंजन व शिक्षण आनंददायी वातावरणात दिले जाते. तेंव्हा आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा , असे आवाहन प्राचार्य श्री सचिन जद सर यांनी केले आहे. अधिक माहिती साठी संपर्क क्र. ८९९९४१८५२४, ९३०७१४०२३२,, ८४२११९०८५१ या क्रमांकावर संपर्क साधा.