डोणोली च्या यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये ‘ मंगळागौरी ‘ कार्यक्रम संपन्न
बांबवडे प्रतिनिधी : डोणोली तालुका शाहुवाडी येथील यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज या पंचक्रोशीत नावाजलेल्या शाळेत गणेशोत्सव व गौरी आवाहन निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. अशी माहिती शाळेचे प्राचार्य श्री सचिन जद सर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.




गणेशोत्सव हा अनेकविध पारंपारिक प्रथा, रूढी आणि संस्कृतीचा उत्सव आहे. गणेशोत्सव काळात गौरी चे आगमन होते. यास्तव अनेक सासुरवाशीण महिला माहेरी विश्रांती साठी येतात. याचबरोबर श्रावण महिना असल्याने निसर्गाची उधळण यावेळी धर्तीवर होत असते. सगळीकडे हिरवळ पसरलेली असते. या निसर्गाचा आनंद घेत अनेक मुली आपल्या माहेरी असलेल्या आप्तेष्टांना भेटतात. आणि त्यानंतर सर्व मैत्रिणी आपल्या पारंपारिक खेळात रममाण होतात.
हाच उत्सव यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज या शाळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी झिम्मा- फुगडी , सुई-फुई, उभा घोडा, काठवठण, आदी खेळ इथं विद्यार्थीनिनी संपन्न केले. यामध्ये सर्व शिक्षकवृंद देखील सहभागी झाले. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सचिव श्री जयंत पाटील, अध्यक्षा श्रीमती पद्मजा पाटील वहिनीसाहेब, संस्थेच्या विश्वस्त सौ. विनिता जयंत पाटील, या मान्यवरांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.