educationalसामाजिक

डोणोली त अवतरतेय शिक्षणाची गंगा…: “यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज “


बांबवडे : शाहुवाडी आणि पन्हाळा हे दोन्ही तालुके दुर्गम भागात वसलेले आहेत. सह्याद्री च्या कड्यांमध्ये सामावलेला इथला शेतकरी केवळ समृद्धीची स्वप्नंच पहात राहिला. त्यांची स्वप्नं जर खऱ्या अर्थाने पूर्ण करायची असतील, तर इथल्या कड्या-कपारींपर्यंत शिक्षणाची गंगोत्री पोहचणं गरजेचं आहे. आणि हे स्व. आमदार यशवंत एकनाथ पाटील म्हणजेच सर्वसामान्यांचे ‘ यशवंतदादा ‘ यांचं मोठं स्वप्नं होतं. त्या अनुषंगाने त्यांनी पाया देखील रचला होता. श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना देखील केली. इथल्या शेतकऱ्याच्या मुलाला ” पीजी टू पीजी ” म्हणजेच ” प्ले ग्रुप ते पोस्ट ग्रॅज्युएट ” असे शिक्षण मिळाले, तर इथला शेतकरी समृद्ध होईल, अशी यशवंत दादा यांची धारणा होती.
त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांचे दुसरे चिरंजीव स्व. प्रदीप बाबा यांनी प्रयत्न केले. संस्थेसाठी अनेक गोष्टी लागतात. त्या गोळा करण्याचा त्यांचा ध्यास होता. कोडोली इथं त्यांची श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाची मोठी इमारत आहे. त्यामध्ये शेकडो विद्यार्थी ज्ञान ग्रहणाचे काम करीत आहेत. यासाठी प्रदीप बाबांचे मोठे योगदान आहे.


परंतु हि शिक्षणाची गंगा मात्र आजदेखील अविरतपणे वहात आहे. स्व. प्रदीप बाबांचे चिरंजीव डॉ. जयंत पाटील यांनी या शिक्षण प्रसारक मंडळाची धुरा आपल्या सक्षम खांद्यांवर पेलून धरली आहे. म्हणूनच या संस्थेच्या आज ३५ शाखा कार्यरत आहेत. इथं आपल्या आजोबांचे किंबहुना वडिलांचे स्वप्न नातू तसेच चिरंजीव म्हणून डॉ. जयंत पाटील पूर्ण करीत आहेत. त्यांच गंगोत्रीची एक धार आज शाहुवाडी तालुक्यात डोणोली इथं बरसत आहे. भविष्यात हि शिक्षण संस्था निश्चितच नावारूपाला येवून, इथल्या शेतकऱ्याला समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही. इथल्या कष्टकरी, मजूर वर्गाला सुद्धा या शैक्षणिक गंगेचा लाभ घेता येणार आहे. श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ यांचे सचिव डॉ. जयंत पाटील हे इथल्या वाडी-वस्तीवर शिक्षण पोहोचवण्याचं काम करणार आहेत. कारण हे त्यांच्या आजोबांनी म्हणजेच माजी आमदार स्व. यशवंत एकनाथ पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न होतं. ते आत्ता त्यांचे नातू डॉ.जयंत पाटील पूर्ण करीत आहेत.


शाहुवाडी तालुक्यातील डोणोली इथं श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ यांचे “यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज ” आकारास येत आहे. या माध्यमातून बांबवडे पंचक्रोशीतील भावी पिढी शैक्षणिक दृष्टीने सुधारत आहे. भविष्यात येणाऱ्या इंग्रजी माध्यमाचा बाऊ या पिढीला भेडसावणार नाही. कारण त्याच अनुषंगाने या शाळेचे नियोजन असून, तशाच पद्धतीने या शाळेसंदर्भाने आखणी करण्यात आली आहे. असे मत शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन जद सर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.


आपण आपल्या पाल्यासाठी उत्तम शाळेच्या जर शोधात असाल, तर आपला शोध इथंच थांबवा. कारण आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही, म्हणजेच यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी सज्ज आहोत. आपली भावी पिढी सक्षम आणि समृद्ध करणे, हाच आमचा ध्यास आहे. असेही जद सर यांनी सांगितले.


हि शाळा डोणोली इथं आकारास येत आहे. इथंच अॅडमीशन आपण का घ्यावं , याचीही कारणं आहेत.
इथं आम्ही समाजाभिमुख शिक्षण देण्याचा निर्धार केला आहे. यासाठी इंथला शिक्षक वृंद उच्च शिक्षित व अनुभवी आहे. शाळेचा परिसर स्वच्छ आणि आनंददायी ठेवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहील. तसेच इथं आम्ही विद्यार्थ्याकडे वयैक्तिक लक्ष देत आहोत. हि शाळा सर्व सोयींनीयुक्त आहे. खेळ, मनोरंजनातून शिक्षण हि आमची पद्धत आहे. विद्यार्थ्यांना नियमित मोफत शिकवणी वर्ग आपण पुरवीत आहोत. तसेच विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यासाठी तसेच वाढविण्यासाठी स्पर्धा परीक्षांचे आयोजन इथं करण्यात येतं. याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याचबरोबर जो विद्यार्थी वर्ग गुणवत्तेत कमी असेल, त्याची हेळसांड न करता, त्याची क्षमता वाढविण्यासाठी शाळेतील शिक्षकांकडे त्या विद्यार्थ्याची जबाबदारी दिली जाते. आणि त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढविण्याचा यशस्वी प्रयत्न केला जातो. तसेच विद्यार्थ्याचे संपूर्ण शिक्षण एकाच शिक्षण संस्थेत होते. कारण अगदी पदवी आणि पदव्योत्तर शिक्षण सुद्धा इथं उपलब्ध आहे.


कमीत कमी फी मध्ये उत्तमोत्तम सुविधांनीयुक्त शिक्षण देण्यावर आमचा भर आहे. याचबरोबर सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपली स्वतंत्र वाहतूक व्यवस्था आहे. त्यामुळे पालकवर्गाला, मुलांना आणण्यासाठी किंवा नेण्यासाठी धावपळ करावी लागणार नाही.


या यशवंत इंग्लिश इंटरनॅशनल अकॅडमी विषयी माहिती देताना सर पुढे म्हणाले कि, या शाळेत विद्यार्थ्याला अनुशासन, त्याचबरोबर खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास यावर भर दिला जात आहे. त्यामुळे पालकवर्गाने आपला शोध थांबवावा, आणि एकदा आमच्या शाळेला भेट देवून पहा. आम्ही विद्यार्थ्यासाठी सर्वोतोपरी कष्ट घ्यायला नेहमीच कटिबध्द आहोत.
आमच्याशी संपर्क साधण्यासाठी : ८६०५६९०१२७, ९३०७१४०२३२, ८९९९४१८५२४ .या क्रमांकावर संपर्क करा.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!