डोणोली-बांबवडे दरम्यान पाटील शेती केंद्रात चोरी : २६ हजार केले चोरट्यांनी लंपास
शाहुवाडी प्रतिनिधी ( संतोष कुंभार ) : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील पाटील कृषी सेवा केंद्रात शटर उचकटून चोरी झाली असून, सदर घटनेची शाहुवाडी पोलीस स्टेशन मध्ये मालक विजय राजाराम पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर डोणोली-बांबवडे दरम्यान बियाणे, कीटकनाशक, खते विक्रीचे पाटील शेती सेवा केंद्र नावाचे दुकान आहे. बुधवार दि.१९ जुलै च्या मध्यरात्री दरम्यान अज्ञान चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील रोख रक्कम २६ हजार रुपये चोरले गेले. गुरुवार दि.२० जुलै रोजी सकाळी दुकान उघडण्याकरिता आल्यानंतर मालक विजय पाटील यांच्या लक्षात हि घटना आली. त्यांनी शाहुवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सिंघन करीत आहेत.