डोणोली येथील यशवंत अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज चा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
बांबवडे : डोणोली तालुका शाहुवाडी इथं असलेल्या श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज चा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा थाटामाटात संपन्न झाला.

यावेळी अकॅडमी च्या विविध विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य दाखवीत ,एका विद्यार्थ्याने अनेक प्रशस्तीपत्रके मिळवीत आपल्या चिमुकल्या वयात ” बाळाचे पाय पाळण्यात दिसतात “. असा ठसा उमटवताना दिसले.

या शाळेत विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असतानाच त्यांच्या इतर कलागुणांना सुद्धा वाव दिला जात आहे.

इयत्ता नर्सरी १० वी च्या विद्यार्थ्यांचे रंगकाम, मूर्ती घडविणे, चित्रकला, इंग्लिश स्पिकिंग स्पर्धा, प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, व्याकरणावर आधारित स्पर्धा, सोलो सांस्कृतिक स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. याच बरोबर खेळामध्ये कराटे, मल्लखांब, रस्सीखेच, विविध मैदानी सांघिक, तसेच वयैक्तिक स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यासाठी समाजातील लोकशाही चा चौथा स्तंभ असलेला पत्रकार वर्ग यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या भूमिकेत उपस्थित होते.

यामध्ये साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज चे संपादक मुकुंद पवार दै. पुण्यनगरी चे सुभाषराव बोरगे, दै. तरुण भारत चे चंद्रकांत शेळके, दै.सकाळ चे अमर पाटील, दै. लोकमत चे आर. डी. पाटील, दै. महासत्ता चे दशरथ खुटाळे, वसंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान या सोहळ्यास पालक वर्ग, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी अकॅडमी चे प्रिन्सिपॉल श्री सचिन जद सर अध्यक्ष स्थानी होते.

यावेळी श्री सचिन जद सरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच शाळेच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. याचबरोबर गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर विद्यार्थ्यांचे अॅडमिशन केल्यास वर्कबुक सेट वर ५० % डिस्काऊंट देण्यात येणार आहे. तसेच २०२२-२३ साली फी मध्ये १०००/- रु. कन्सेशन देण्यात येणार आहे. तेंव्हा त्वरित अॅडमिशन करा, असे आवाहन देखील जद सरांनी यावेळी केले.
तसेच पत्रकारांच्यावतीने अमर पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री घाटगे व दिव्यांका केमाडे या विद्यार्थीनिनी केले. तर उपस्थितांचे आभार श्रावणी पाटील या विद्यार्थिनीने शाळेच्या वतीने मानले.