डोणोली सेवा संस्थेवर भैरवनाथ रेणुकादेवी परिवर्तन पॅनेल चा सर्वच्या सर्व जागा जिंकून दणदणीत विजय
बांबवडे : डोणोली तालुका शाहुवाडी येथील डोणोली वि.का.स. सेवा संस्थेच्या झालेल्या निवडणुकीत श्री भैरवनाथ, रेणुका देवी परिवर्तन पॅनेल ने सर्व च्या सर्व म्हणजे १३ जागा जिंकल्या. यामुळे डोणोली ग्रामस्थांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

डोणोली विकास सेवा सेवा संस्थेची निवडणूक मानसिंगदादा गटाचेच दोन्ही पॅनेल निवडणूक लढवीत होते. विजयी पॅनेल चे नेतृत्व माजी उपसरपंच विठ्ठलराव पोवार यांनी केले होते.

या निवडणुकीत पोवार यांनी विरोधी पॅनेल चा १३ विरोधी ० ,म्हणजेच एकही जागा विरोधी गटाला मिळून दिलेली नाही. विठ्ठल पोवार आणि सहकारी यांचे गावातून अभिनंदन होत आहे.