…तर यशाचा सूर्योदय आपलाच : संतोष झंजाड
मुंबई : सह्याद्री च्या छाव्याने झेप घ्यावी कशी,
आसमंताच्या गरुडाने भरारी मारावी तशी,
हिमालयाच्या हिमशिखरांनी जसे आकाश घ्यावे मुठीत,
तसेच “ संतोष ” यांच्या प्रगतीने आकाश घ्यावे मिठीत …
मराठी तरुण किरकोळ अपयशांनी खचतो, परंतु तसे न करता, धीर न सोडता कर्तृत्वात जर कसूर केली नाही, तर उद्याचा यशाचा सूर्योदय आपलाच आहे. हे सिद्ध केलंय ठाण्यातील माजिवडा येथील केके कॉम्प्युटर चे संचालक संतोष झंजाड या तरुणाने. आज या संतोष झंजाड यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभो, तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा.
संतोष यांनी महाविद्यालयीन वयातच त्यांच्या या केके कॉम्प्यूटर च्या व्यवसायात लक्ष घातले होते. स्वत: एमटेक असूनही, या तरुणाने आपली झेप व्यवसायाकडे घेतली. त्यांना नोकरीच करायची असती, तर त्यांना चार-पाच आकड्यांचा पगार सहज मिळाला असता. परंतु इतर मराठी तरुणांप्रमाणे नोकरी कडे न वळता त्यांनी आपली घोडदौड व्यवसायाकडे वळवली, आणि पाहता,पाहता केके कॉम्प्युटर ची यशाची घोडदौड सुरु झाली. त्यांच्या आई सौ.कांता झंजाड या एकट्याच हा व्यवसाय चालवीत होत्या. संतोष यांनी या व्यवसायात लक्ष घालताच या व्यवसायाचे त्यांनी आधुनिकीकरण केले. आधुनिक तंत्रज्ञान आणि जोडीला कष्टाचा सह्याद्री बरोबर घेवून, हा आधुनिक शिवरायांचा मावळा यशाचा एक एक गड सर करू लागला. काही अवधीतच ते महाराष्ट्र राज्य संगणक टंकलेखन, लघुलेखन संघटना चे ते महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख या महत्वाच्या जागेवर त्यांची नियुक्ती झाली. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या ऑब्जेक्टीव्ह प्रश्नांबाबत त्यांनी आरल पब्लिकेशन ची निर्मिती करून पुस्तक प्रकाशित केले. आणि याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांनी एक नवी दिशा मिळवून दिली. केवळ स्वत:च नव्हे, तर आपल्याबरोबर इतरांचेही भले व्हावे, म्हणून त्यांनी, त्यांची आत्त्या सौ.मंजिरी पवार यांना देखील यासाठी प्रवृत्त केले.
तरुणाने नेहमी यशाकडे झेप घेण्यासाठी कर्तुत्वाचा यज्ञ मांडावा. यासाठी घामाची आणि परिश्रमाची समिधा सातत्याने या यज्ञात टाकायला मात्र, कसूर करू नये. असे झाले, तर आपले यश आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे वडील श्री काशिनाथ झंजाड यांनीदेखील आपल्या आयुष्यातील अनुभवाची शिदोरी आपल्या दोन्ही मुलांसमोर उघडी केली. आणि संतोष यांच्यासह त्यांचे भाऊ सागर झंजाड हे एमबीए असूनही त्यांनी स्वत: चा व्यवसाय सुरु केला. त्यांनी देखील आपल्या व्यवसायात आपली चुणूक दाखविली.
थोडक्यात मराठी तरुणांना जर यश हवे असेल, समृद्धी हवी असेल, तर व्यवसायात कष्टासह उतरण्याशिवाय पर्याय नाही. हिमालयाच्या हिमशिखरांना जर सर करायचे असेल, तर मनात दृढनिश्चय घेवून संतोष यांनी कष्टाची यशवंती बरोबर घेतली, आणि यश हिसकावून आणले. आजही त्यांचे अनेक मनसुबे सर करायचे बाकी आहेत. आणि भविष्यात ते सर करतील,यात शंका नाही.
पुन्हा एकदा संतोष झंजाड यांना त्यांच्या भावी वाटचालीस सौ मंजिरी पवार आणि परिवार यांच्याकडून कोटी कोटी शुभेच्छा…