तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान
बांबवडे : शाहुवाडी तहसीलदार कार्यालयाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या हस्ते शाल, प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना तहसीलदार म्हणाले कि, महसूल प्रशासन आणि पत्रकार यांनी सलोख्याने काम केल्यास सर्व सामान्य जनतेचे प्रश्न लवकर सोडवू.
यावेळी डॉ. डी.आर. पाटील, रमेश डोंगरे, सुभाष बोरगे, शामराव पाटील, कार्याध्यक्ष मुकुंद पवार, अध्यक्ष आनंदराव केसरे आदी मंडळींनी मनोगते व्यक्त केलीत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार लव्हे यांनी केले