तालुक्यातील ‘ तरुणाई ‘ आत्महत्या करतेय ?… : पालकांनो तरुणाई शी सुसंवाद साधा.
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील आत्महत्या एक चिंतेचं कारण होवू लागलं आहे. तेंव्हा पालक, पोलीस यंत्रणा, आणि सामाजिक संघटना यांच्याकडून प्रबोधनाची अपेक्षा आहे.
या मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचे कारण एवढेच कि, हातातोंडाशी आलेली तरुणाई नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्येस प्रवृत्त होत आहे,हे पाहणे हि आपली सामाजिक जबाबदारी सुद्धा आहे. यासाठी सर्वच पालकांनी आपल्या तरुण युवक, युवतींशी सुसंवाद साधणे, हि काळाची गरज होवू लागली आहे. आपण वेळीच याकडे गांभीर्याने लक्ष दिले तर, पुढचा अनर्थ नक्कीच टळल्याशिवाय राहणार नाही. यासाठी सामाजिक प्रबोधन सुद्धा तितकेच गरजेचं आहे. ज्या माध्यमातून आयुष्यातील येणाऱ्या संकटांना हि मुले धैर्याने तोंड देतील, आणि भावी पिढी भरकटण्यापासून सावरेल.

तालुक्यातील अनेक ठिकाणी आकस्मिक निधन झाल्याच्या घटना समोर येत आहेत. यामध्ये तरुणाई च प्रमाण अधिक आहे. या आकस्मिक घटना म्हणजे आत्महत्या आहेत, अशी बऱ्याच ठिकाणाची पाहणी केल्यानंतर विश्वसनीय सूत्रांकडून समजत आहे. काही घटना तर बांबवडे पोलीस चौकी च्या पुढ्यातच घडल्या आहेत,तरीसुद्धा याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने पाहिलेलं नाही. हि तरुण मुलं आत्महत्या का करीत आहेत ? या प्रश्नाचं उत्तर अद्याप पर्यंत ना पालकांना मिळालं, ना पोलीस यंत्रणेन या घटना गांभीर्याने घेत आहेत.

दरम्यान या आकस्मिक घटना खऱ्या अर्थाने आकस्मिक आहेत कि, त्याची काही अनेक कारणे आहेत ? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे औचित्य पोलीस प्रशासन घेत नाही. याचं कारण या घटनांची पोलीस ठाण्यात नोंद होत नाहीय. त्यामुळे पोलीस प्रशासन याकडे लक्ष घालू शकत नाहीत. दरम्यान हि जबाबदारी खऱ्या अर्थाने त्या, त्या गावातील पोलीस पाटील यांची ती जबाबदारी आहे. परंतु या घटनांकडे पोलीस पाटील दुर्लक्ष करीत आहेत, किंवा त्यांच्यावर ग्रामस्थांचा दबाव येतोय का ? याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे.