congratulationsसामाजिक

तालुक्यातील प्रतिभासंपन्न पत्रकार डॉ. डी. आर. पाटील सर यांचे मनस्वी अभिनंदन


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील ज्येष्ठ आणि विचारवंत पत्रकार डॉ. डी.आर. पाटील यांना रशिया मधील मॉस्को येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधी मिळाली. तसेच त्यांनी आपल्या प्रतिभासंपन्न लेखणीतून तेथील वृत्तलेखन केले. याबद्दल त्यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स, एसपीएस न्यूज तसेच शाहुवाडी तालुका पत्रकार संघ व तालुक्यातील सर्वच पत्रकारांच्या वतीने हार्दिक अभिनंदन.


शाहुवाडी तालुका हा दुर्गम तालुका आहे. इथं फारशा सुविधा उपलब्ध नाहीत. परंतु इथली माती प्रतिभा संपन्न आहे. म्हणूनच डॉ.डी.आर. पाटील सर यांच्यासारखी प्रतिभा संपन्न व्यक्ती तालुक्यातील विविध मुद्द्यांवर लेखन करीत आहेत. ते दै. सकाळ च्या माध्यमातून गेली दोन दशके कार्यरत आहेत. परंतु समाजातील अनेक चुकीच्या रूढी परंपरा यांच्याविरुद्ध निर्भीडपणे लेखन केले आहे. तसेच तालुक्यातील सामाजिक,राजकीय विश्लेषक म्हणून त्यांच्याकडे इथली जनता पहात आहे.


डॉ. डी. आर. पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स चे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुध्दे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्याक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत आण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या सामान्यातून असामान्य व्यक्तिमत्व निर्माण केलेल्या लोकशाहीर यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास उपस्थिती दर्शविली. हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.


अशा पाटील सरांना विदेशात जावून लेखन करण्याची संधी मिळाली, हे त्यांचे स्वत:चे कर्तुत्व आहे. अशी संधी मिळणे आणि त्याचे सोने करणे, हेसुद्धा सोपे नव्हे. आमच्या या प्रतिभासंपन्न मित्रांना हि संधी मिळाली हि आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्यासहित त्यांचे आई – वडील यांना विनम्र अभिवादन. आमच्या मित्रांना पुनश्च लाख लाख शुभेच्छा

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!