तीस वर्षांच्या कामाची पोच पावती : ध्वजारोहण
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील ध्वजारोहण करण्याचा मान येथील ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज चे संपादक श्री मुकुंद पवार यांना देण्यात आला. त्यांच्या हस्ते ग्रामपंचायत बांबवडे चे ध्वजारोहण करण्यात आले. यासाठी मुकुंद पवार यांच्याकडून ग्रामपंचायत चे सरपंच श्री भगतसिंग चौगुले, उपसरपंच सुरेश नारकर, दीपक निकम, स्वप्नील घोडे-पाटील यांच्यासह सर्व सदस्य,, व महिला सदस्य भगिनी, दीपक पाटील अमर निकम, विजय कांबळे यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

बांबवडे गावाचे लोकनियुक्त सरपंच व त्यांचे सदस्य मंडळ यांनी प्रतिवर्षी अनेक ध्वजारोहणाचा मान आजवर समाजातील अनेक घटकांना देण्यात आला आहे. संचालक मंडळ नियुक्त झाल्यापासून शेतकरी, ग्रामपंचायत शिपाई, निवृत्त अंगणवाडी सेविका, माजी सैनिक, पत्रकार अशा समाजातील विविध घटकांना हा मान देण्यात आला आहे. हा नवा प्रघात तालुक्यात कुठे नसावा, असे हे दातृत्वाचे देणे ग्रामपंचायत बांबवडे ने आजवर दिले आहे.



पत्रकार मुकुंद पवार यांच्या हस्ते झालेले ध्वजारोहण आपण कधी विसरू शकणार नाही कारण समाजाला न्याय देण्यासाठी आपला जन्म आहे. यापलीकडे कोणत्याही मानाची कधीही आमची अपेक्षा नसते. गेल्या तीस वर्षे समाजासाठी केलेल्या कामाची पोच पावती या ध्वजारोहणाच्या माध्यमातून मिळाली. असे मत संपादक मुकुंद पवार यांनी व्यक्त केले.
