त्रिपक्षीय समिती ची अमलबजावणी झालीच पाहिजे -श्री सुभाष गुरव
बांबवडे : अथणी शुगर्स तथा उदयसिंगराव गायकवाड साखर कारखाना च्या कामगारांना अद्याप त्रिपक्षीय समितीच्या शिफारशी लागू केलेल्या नाहीत. हि बाब म्हणजे कामगारांचे शोषण करण्यासारखे आहे. या त्रिपक्षीय समिती ची तंतोतंत अंमलबजावणी झाली पाहिजे. असे मत श्री सुभाष गुरव जनरल सेक्रेटरी फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांनी व्यक्त केले आहे. बांबवडे तालुका शाहुवाडी येथील ज्ञानराजा मंगल कार्यालय मध्ये कामगारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून श्री गुरव बोलत होते.
अथणी शुगर्स युनिट २ कर्मचारी व जमीनधारक यांनी एप्रिल महिन्यात वेतन आयोग कामगारांना लागू करा. यासहीत अनेक मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी अथणी शुगर्स च्यावातीने तथा उदय साखर च्या बतीने श्री रवींद्र देशमुख व भगवान पाटील कार्यकारी संचालक यांनी लेखी या मागण्या एक महिन्याच्या आत पूर्ण करण्यात येतील, अशा आशयाचे हमीपत्र कामगार मंडळींना दिले होते. परंतु त्याची अद्याप पूर्तता न झाल्याने येथील कामगार संघटनेने पुढील कार्यवाही साठी क्म्गारांची बैठक बोलावली होती. यावेळी कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी कामगार फेडरेशन चे जनरल सेक्रेटरी श्री गुरव यांच्यासह, शरद साखर चे व सरसेनापती संताजी घोरपडे साखरचे पदाधिकारी निमंत्रित केले होते. यावेळी श्री गुरव बोलत होते.
ते पुढे म्हणाले कि, हंगाम सुरु होण्यापूर्वी कामगारांना त्रिपक्षीय समिती च्या शिफारशी लागू करणे , हे कारखानदारांना बंधनकारक असते. परंतु इथं २०१४ पासून सुद्धा याची आमलबजावणी झालेली नाही. कामगारांच्या अज्ञानपणाचा घेतलेला हा गैरफायदा आहे. यासाठी लढाऊ कामगारांची एकजूट झाल्याशिवाय तुमच्या पदरात काही पडणार नाही. यासाठी कामगारांची एकजूट गरजेची आहे. असे आवाहन देखील श्री गुरव साहेब यांनी केले.
यावेळी अन्य वक्त्यांनी सुद्धा कामगारांना मार्गदर्शन केले. यावेळी दीपक निकम तात्या यांनी सुद्धा आपण एकजूट होवून कारखानदारांकडून आपल्या मागण्या मान्य करून घेवू या. त्यांनी एकदा आपल्यला फसवले आहे. पुन्हा आपण फसायचे नाही. आणि कामगार हिताच्या सर्व मागण्या मान्य करून घेतल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. असे आवाहन देखील श्री निकम यांनी केले.
यावेळी मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले. यावेळी संताजी घोरपडे साखर चे अमृत पाटील, तसेच अध्यक्ष मोहन पाटील, उपाध्यक्ष काशिनाथ घोडके, शरद साखर युनियान चे खजिनदार दिगंबर खाडे, उपाध्यक्ष संपतराव पाटील, अध्यक्ष बबन भंडारी, महाराष्ट्र राज्य फेडरेशन चे जनरल सेक्रेटरी उदय भंडारी, आदि मान्यवरांनी कामगारांना मार्गदर्शन केले. यावेळी कामगारांनी सुद्धा आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी सुमारे सहाशे कामगार या बैठकीला उपस्थित होते. यावेळी श्री भगवान निकम आप्पा, उदय साखर संघटनेचे अध्यक्ष श्री प्रभाकार बच्चे, उपाध्यक्ष चंद्रकांत चोरगे, राजेंद्र निकम, दिलीप बंडगर, अरुण निकम, संदीप निकम,यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार रमेश डोंगरे यांनी मानले सविस्तर वृत्त स. शाहुवाडी टाईम्स च्या ३० जून २०२५ अंकात प्रसिद्ध होईल.