थेरगाव इथं आंतरारष्ट्रीय कुस्त्यांचे आज जंगी सामने
बांबवडे : देशभक्त रत्नाप्पा आण्णा कुंभार यांच्या ११५ व्या जयंती निमित्त थेरगाव तालुका शाहुवाडी इथं जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पोपटराव दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. नृसिंह तालीम मंडळ व सुनील खोपडे युवा मंच यांच्या वतीने गुढी पाडव्याचे औचित्य साधून या आंतरारष्ट्रीय कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
थेरगाव इथं होणाऱ्या मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीसाठी पै. पारी राजद इराण विरुद्ध पै.प्रवीण कुमार पंजाब केसरी यांच्यात लढत होणार आहे. तर दुसऱ्या क्रमांकासाठी पवन कुमार हरयाणा केसरी विरुद्ध पै. राघू ठोंबरे शाहुवाडी तालीम अशा लढती होणार असून, शिवाय लहान मोठ्या १०० हून अधिक कुस्त्य होणार आहेत. कुस्ती शौकीनांनी या आंतरारष्ट्रीय कुस्त्या पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन देखील संयोजकांकडून करण्यात आले आहे. दरम्यान यावेळी पै. बिशाली यादव विरुद्ध पै.ऋतुजा संकपाळ या महिलांची कुस्ती देखील आपणास पहावयास मिळणार आहे. अशी माहिती श्री पोपटराव दळवी यांनी दिली.