थेरगाव इथं वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण
बांबवडे : थेरगाव तालुका शाहुवाडी येथील गावासाठी रुग्णवाहिका देण्याचा उपक्रम रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय चिखलकर यांनी संपन्न केला.
श्री विजय चिखलकर यांची कन्या कुमारी ईश्वरी विजय चिखलकर हिचा आज दि.२७ जुलै रोजी १२ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या दिवशी होणारा खर्चाचा अपव्यय टाळून गावाच्या हितासाठी रुग्णवाहिका लोकार्पण हे सामाजिक काम केले असल्याचे श्री विजय चिखलकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले. या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी कानसा-वारणा फौंडेशन चे संस्थापक श्री दीपक पाटील, मराठा महासंघ तालुकाध्यक्ष सुनील पाटील, दादासो रेडेकर, सुरज जंगम, संग्राम पाटील, सचिन यादव, नागोजी पाटील थेरगाव सरपंच, मनसे तालुकाध्यक्ष बाळासाहेब कदम, अनिल शेळके, व सर्व टायगर ग्रुप असे मान्यवर यावेळी उपस्थित होते.एसपीएस न्यूज च्या वतीने ईश्वरी चिखलकर हिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.