थेरगाव विद्यामंदिर ची श्रुतिका शिंदे हिची नवोदय साठी निवड – श्री रवींद्र सुर्वे सरांचे अभिनंदन
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील विद्यामंदिर थेरगाव शाळेची विद्यार्थिनी कु. श्रुतिका ब्रम्हदेव शिंदे हिची कागल च्या जवाहर नवोदय विद्यालय साठी निवड झाली आहे.

कु, श्रुतिका शिंदे हि इयत्ता सहावी त शिकत आहे. थेरगाव विद्यामंदिर शाळेच्या इतिहासातील नवोदय साठी निवड होणारी श्रुतिका हि पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. यामुळे ग्रामस्थांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

या विद्यार्थिनीला शाहुवाडी तालुक्यातील स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक व नियोजक रवींद्र सुर्वे सर यांचे मार्गदर्शन लाभले. श्रुतिका हि सुर्वे सरांच्या मार्गदर्शनाखाली निवड होणारी पंचविसावी विद्यार्थिनी आहे.

या यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक श्री नंदुरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी गटशिक्षणाधिकारी नंदकुमार शेळके यांच्या शुभहस्ते करण्यात आले.