दर्जेदार इलेक्ट्रिकल साहित्य आणि योग्य दर यासाठी ” बालाजी इलेक्ट्रिकल्स ” हा उत्तम पर्याय
बांबवडे : सध्याच्या परिस्थितीत तरुणाई बहुतांशपणे उद्योग व्यवसायाकडे नोकरी च्या तुलनेत अधिक वळू लागली आहेत.. यामुळे स्वावलंबन अधिकृतपणे समोर येवू लागले आहे. एकेकाळी “आमच्या मुलाचं नोकरीचं तेवढं बघा, असं म्हणंत, वडिलांना, आपल्या मुलाच्या नोकरीसाठी अनेकांचे उंबरे झिजवावे लागत होते. पण सध्या परिस्थिती बदलताना दिसतेय. बांबवडे तालुका शाहुवाडी येथील पोस्ट कार्यालयाच्या शेजारी अविनाश सर्जेराव पोवार या तरुणाने आपल्या क्षेत्राच्या बाहेर जावून आपला व्यवसाय निवडला, आणि तो प्रगतीपथावर सुद्धा नेण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला आहे. कारण अविनाश बी फार्म झाला आहे. त्यांच्या या व्यवसाय प्रगती बद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांचे अभिनंदन.


एकेकाळी नोकरीच्या जोखडात अडकून पडलेल्या तरुणाई ला आता कळून चुकले आहे कि, नोकरी पेक्षा व्यवसाय कधीही श्रेष्ठ च. श्री अविनाश पोवार यांनी २०२१ साली ” बालाजी इलेक्ट्रिकल्स ” नावाचे इलेक्ट्रिक साहित्याचे दुकान सुरु केले. अवघ्या एक वर्षात त्यांनी आपल्या व्यवसायावर प्रेम करून, निष्ठेने तो चालविला आहे. उत्तम दर्जा आणि योग्य किमत यांचा समन्वय साधून त्यांनी व्यवसाय केल्यामुळे त्यांचे अनेक ग्राहकांशी चांगले संबंध तयार झाले. कोणाला फसवायचे नाही, आणि आपल्या साहित्याचा योग्य दर्जा राखत त्याची किमत आकारायची ,हे सूत्र अविनाश यांना त्यांच्या व्यावास्यासाठी उपयोगी पडले आहे.
घरगुती इलेक्त्रीकल फिटिंग साठी लागणारे सर्व साहित्य या बालाजी इलेक्ट्रिकल्स मध्ये माफक आणि योग्य दरात मिळते.

एलईडी पॅनेल्स, स्पॉट लाईट, स्ट्रीट लाईट, अप डाऊन लाईट, पॉलीकॅब पाईप, जीआय तार, सर्व प्रकारच्या सर्विस केबल्स, ट्यूब लाईट, बल्ब, एलईडी हॅलोजन, एनडीआय, आणि जीएम मेटल बॉक्स, कन्सील्ड फिटिंग साठी लागणारे सर्व साहित्य, इथे उपलब्ध आहे.

त्याचबरोबर फॅन, गिझर, टेबल फॅन, सिलिंग फॅन, वॉल फॅन, इस्त्री, पाणी तापविण्यासाठी लागणारे हिटर नामांकित कंपन्यांचे सर्व इलेक्ट्रिकल साहित्य इथे उपलब्ध आहे. उदा.HAVELLS, GM, BAJAJ, orient, Finolex, G ,POLYCAB नामांकित कंपनीचे दर्जेदार साहित्य होलसेल व रिटेल दरात उपलब्ध आहे. तेंव्हा उत्तम गुणवत्ता आणि योग्य दर ,यासाठी ” बालाजी इलेक्ट्रिकल्स ” हा योग्य पर्याय आहे. असे मत अविनाश पोवार यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले. अधिक माहिती साठी मो. क्र. ८४११८४८५०८, ९३०९९७३१५१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन देखील अविनाश पोवार यांनी केले आहे.