दातृत्व जपणारा एक खंदा शिवसैनिक-श्री यशवंत पाटील
शाहुवाडी प्रतिनिधी :शाहुवाडी तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कट्टर समर्थक असलेले श्री यशवंत पाटील हे एक समाजशील व्यक्तिमत्व आहे. मुंबईत अभियंता पदावर नोकरी करीत असताना तालुक्यातील गोरगरीब, होतकरू, नागरिकांना प्रती वर्षी वाढदिवसानिमित्त फुल न फुलाची पाकळी देत आले आहेत. तालुक्याच्या मातीला कपाळाला लावल्याशिवाय या व्यक्तिमत्वाला राहवत नाही. म्हणूनच यावर्षी सुद्धा वाढदिवसानिमित्त शाहुवाडी तील अनाथ आश्रमातील मुलांना त्यांनी भेट दिली आहे.
सर्वसामान्य घरातील असूनसुद्धा दातृत्व हे त्यांनी कधी विसरले नाही. याचाच आधार धरून घरकाम करणाऱ्या गृहिणींना सुद्धा त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते फुल न फुलाची पाकळी भाऊबीज म्हणून त्यांनी दिली आहे. तालुकाप्रमुख दत्ता पोवार, दिनकर लोहार यांच्यासारखे कार्यकर्ते तालुक्याला संघटीत करून आहेत. या व्यक्तीने प्रसिद्धी चा कधी हव्यास धरला नाही. पडद्याआड केलेली मदत हि त्यांच्या दृष्टी ने महत्वाची आहे. परंतु अशा दातृत्ववान व्यक्तिमत्वाला प्रसिद्धी नव्हे तर, त्यांचा हक्क त्यांच्यापर्यंत पोहचवणे , हे आपले कर्तव्य आहे.
हे व्यक्तिमत्व साहेब असल्यापासून शिवसेनेवर प्रेम करीत आले आहे. बाकीची मंडळी नंतर आलीत. पण हे व्यक्तिमत्व साहेबांवर जीव ओवाळून टाकणारे आहे. असे असून हि शिवसेनेला या व्यक्तिमत्वाला एखादे चांगले पद देणे जमले नाही. या अगोदर ते माजी तालुका संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत होते. असो, शिवसेनेवर मनापासून प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व सदैव शिवसेनेबरोबरच राहणार आहे. पद द्या,अथवा देवू नका. जय महाराष्ट हे शब्द हृदयात सदैव जिवंत ठेवणारे हे व्यक्तिमत्व आहे. म्हणूनच त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सा. शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

