” दिलदार ” भैय्या एक अजातशत्रू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी दिलदार मकबूल तांबोळी यांचे झालेले अपघाती निधन, बांबवडे पंचक्रोशीला सहन झालेले नाही. त्यांच्या निधनाबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स, एसपीएस न्यूज, पवार कुटुंबीय व बांबवडे वासियांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
दिलदार भैय्या नाव्प्रमाणेच दिलदार होते. कोणालाही सहकार्य करण्यात ते कधी कमी पडले नाहीत. त्यांच्या दिलावर फोटो स्टूडीओ च्या माध्यमातून त्यांनी आपले कार्य सुरु केले होते. दिलदार भैया विषयी कोणी चुकीच बोलणारच नाही. कारण त्यांचा स्वभाव मनमिळावू आणि सामाजिक बांधिलकी जपणारा होता. बांबवडे मध्ये त्यांचा अनेक कुटुंबांशी जिव्हाळ्याचा घरोबा होता.
त्यांचे वडील मकबूल तांबोळी हे बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षक होते. तर दुसरे बंधू दिलखुष हे डॉक्टर आहेत. तसेच ज्यांच्या नावाने फोटो स्टूडीओ सुरु आहे ते तिसरे बंधू सध्या शिक्षक आहेत. असे हे तांबोळी कुटुंब शैक्षणिक दृष्ट्या सुज्ञ असून, सामाजिक बांधिलकी जपून आहेत. त्यांचा मुलगा निहाल तांबोळी यांचे दोन वर्षांपूर्वीच अल्पश: आजाराने निधन झाले आहे. अशा या समाजप्रिय कुटुंबावर पुन्हा एकदा काळाने घाला घातला, आणि दिलदार भैय्यांचे अपघाती निधन झाले. आज त्यांचे पार्थिव बांबवडे इथ आणण्यात येत आहे. अशा या दिलदार भैय्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.