दिवंगत आनंदा कांबळे फौंडेशन च्यावतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान
बांबवडे : दिवंगत आनंदा दौलू कांबळे सोशल फौंडेशन घुंगुर ता. शाहुवाडी च्या वतीने कोविड योद्धा गौरव पुरस्कार नुकताच संपन्न झाला. बांबवडे येथील शिवसमर्थ हॉल मध्ये हा गौरव समारंभ संपन्न झाला.

advt
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बांबवडे चे सरपंच सागर कांबळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाहुवाडी पोलीस ठाणे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख उपस्थित होते.

या गौरव सोहळ्या प्रसंगी बोलताना अध्यक्षस्थानावरून सरपंच सागर कांबळे म्हणाले कि, आजवर कधी न झालेली महामारी कोरोना च्या अनुषंगाने जगासाहित आपल्या देशावर सुद्धा आली. पर्यायाने आपल्या तालुक्यावर सुद्धा आली. या महामारीला तोंड देण्यासाठी ज्या यंत्रणेने आपले योगदान दिले,त्यांचे आभार मानत, ज्यांनी आपले सर्वश्रेष्ठ योगदान दिले अशा मान्यवरांना सन्मानित करणे, हि सामाजिक जबाबदारी आहे. हि जबाबदारी दिवंगत आनंदा दौलू कांबळे सोशल फौंडेशन घुंगुर ने समर्थपणे पेलली.

यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष सरदार कांबळे म्हणाले कि, कोरोना च्या या महामारीत अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. परंतु समाजाचे प्राण वाचविण्याचे महत्कार्य ज्या मंडळींनी केले त्यांचे अभिनंदन करणे, हि आमची सामाजिक बांधिलकी आहे, म्हणूनच आजचा हा गौरव सोहळा आयोजित केला आहे.

यावेळी डॉक्टर्स, नर्सेस, आशा भगिनी, महसूल कर्मचारी, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवरांचा प्रशस्तीपत्रक व बुके देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ. संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, विष्णू यादव, आनंदराव केसरे पत्रकार, मुकुंद पवार, शिवसमर्थ हॉल चे मालक विजयराव चौगुले, आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.
फौंडेशन चे उपाध्यक्ष अशोक दत्तू कांबळे , सचिव दीपक वसंत कांबळे,यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार रमेश डोंगरे यांनी केले, तर शंकर कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ८७ कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. यासाठी सरदार वसंत कांबळे आणि परिवार, त्याचबरोबर फौंडेशन च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी मंचकावर बांबवडे ग्रामपंचायत सदस्य सुरेश नारकर, शिवसमर्थ हॉल चे मालक विजयराव चौगुले, परखंदळे सरपंच सौ. दळवी त्याचबरोबर सरदार कांबळे यांच्या सुविद्य पत्नींसह, लक्ष्मण कांबळे आदी अनेक मंडळी उपस्थित होते.