” दिशा कम्युनिकेशन ” चे १४ व्या वर्षात यशस्वी पदार्पण आणि ग्राहकांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा
बांबवडे : बांबवडे हि शाहुवाडी तालुक्यातील मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत अनेक स्पर्धांमधून टिकून रहाणे, हे खऱ्या अर्थाने केलेल्या कष्टाचे चीज आहे, असे म्हणावयास हरकत नाही.

बांबवडे इथं ” दिशा कम्युनिकेशन ” नावाचे मोबाईल शॉपी गेली १३ वर्षे व्यवसायात आहे. आणि समृद्ध सुद्धा आहे. हे दिशा कम्युनिकेशन यशाची १३ वर्षे पूर्ण करून १४ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहेत. या यशाची कहाणी सांगताना दिशा कम्युनिकेशन चे मालक अनिल शेळके राहणार डोणोली, हे नितांत समाधानी वाटले.

यावेळी एसपीएस न्यूज शी बोलताना, अनिल शेळके म्हणाले कि, हा व्यवसाय तुटपुंजा भांडवलात १९९७ साली सुरु केला. तेंव्हा सुरुवातीला एक पान पट्टी सुरु केली, आणि पाहता पाहता, या तरुणाने मोबाईल क्षेत्रात पदार्पण केले. या व्यवसायात आपले सर्व कष्ट केले. यासाठी अनेकजणांनी सहकार्य सुद्धा केले. परंतु जिद्द, चिकाटी, आणि प्रामाणिकपणा या त्रिसूत्री च्या जीवावर आज यशाच्या १४ व्या वर्षात पदार्पण करीत आहोत.

या व्यवसायात अनेक कंपनींचे मोबाईल्स, त्यांची अॅक्सेसरीज, तसेच मोबाईल दुरुस्ती करीत आहे. ग्राहकांशी प्रामाणिकपणे वेळेत सेवा देत आलो. तसेच विक्री पश्चात सेवा याकडेही जातीने लक्ष देत आलो. म्हणूनच आज यशाची एक एक पायरी चढत आहे.
लवकरच मराठी वर्षाची सुरुवात होत आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आपला गुढी पडावा.

आमच्या सर्व ग्राहकांना, तसेच मित्रपरिवारांना, हितचिंतकांना, मराठी नूतन वर्षाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा. याच अनुषंगाने ” दिशा कम्युनिकेशन ” च्यावतीने आमच्या ग्राहकांसाठी विविध योजना घेवून येत आहोत. असेही दिशा कम्युनिकेशन चे अनिल शेळके यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.