सामाजिक

दुखणं एकीकडे तर औषध दुसरीकडे -वनविभागाची स्थिती

शाहुवाडी प्रतिनिधी ( दशरथ खुटाळे ):
शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर वारूण पैकी ढवळेवाडी येथील एका आठ वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले. नुकतेच या घटनेला दहा ते बारा दिवस झाले असताना पुन्हा बिबट्याने एका मुलीवर सायंकाळी ५ वाजता, तर एका युवकावर रात्री ९ वाजता हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा केल्याने बिबट्याने मुलीसोबत असलेल्या शेळीवर हल्ला करून तिला जखमी केले. तर युवकाचा पाठलाग केला असता बिबट्याच्या तावडीतून आपला जीव वाचवण्यासाठी पळताना दगडात ठेच लागून पडल्याने युवक गंभीर जखमी झाला. सुदैवाने यात दोघेही वाचले असून या घटनेची माहिती वन विभागाला फोन द्वारे देण्यात आली मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिथे जाण्या ऐवजी तेथील नागरिकांना घराला कडी लावून आत बसण्याचा सल्ला दिला या घटनेमुळे येथील नागरिकाबरोबर लहान मुलांनी देखील अख्खी रात्र जागून काढली. दरम्यान या घटनेची गंभीर दखल तालुक्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी घेतली, आणि त्यांनी घटनास्थळाला भेट दिली. एकीकडे कर्तव्यदक्ष अधिकारी आणि दुसरीकडे कामचुकार वनविभाग या दोघांची सांगड घालायची तरी कशी ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.


दुखणं एकीकडे तर औषध दुसरीकडे : वनविभागाची स्थिती
दरम्यान येथील नागरीकांनी शाहूवाडी चे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता तहसीलदार चव्हाण हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेत सर्वांची विचारपुस केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी वयस्कर महिलांनी आपली कैफियत तहसीलदारांच्या समोर मांडली. ज्या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी नागरिकांनी बिबट्या पकडण्यासाठी लावलेला सापळा हा गावातील वस्तीवर लावण्याऐवजी गावाबाहेर जवळपास दोन किलोमीटर अंतरावर लावल्याने बिबट्या सापळ्याकडे फिरकलाच नाही. उलट वस्तीवर येऊन हल्ला करत आहे. मग सापळा गावाबाहेर लावण्याचे काय काम असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.


यावेळी तहसीलदार चव्हाण यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडली केली व बिबट्याच्या त्वरित बंदोबस्त करून याबाबत ठोस उपाययोजना करण्याबाबत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!