देशाचा ७३ व प्रजासत्ताक दिन चिरायू होवो….
बांबवडे : २६ जानेवारी २०२२ , आपल्या देशाचा ७३ वा प्रजासत्ताक दिन संपन्न होत आहे. या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील सर्व देशवासियांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

देश सध्या कोरोना सारख्या महामारीतून संक्रमित होत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, तसेच सामाजिक अंतर पाळणे, या नियमांचे पालन करावे, ज्या माध्यमातून कोरोना शी दोन हात करता येईल.

सध्या देशात राज्य आणि केंद्र शासन निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत. त्याठिकाणी मात्र कोरोना नसावा, अशीच परिस्थिती दिसत आहे. आणि पोलीस मात्र सामान्य जनतेच्या पाठीशी लागत आहेत. मागील वर्षी तर अनेक तरुणांना पोलिसांचा मार देखील खावा लागला. हे प्रजासत्ताक राज्य आहे, तर देशात नियमांबाबत नेत्यांना वेगळा न्याय आणि जनतेला वेगळा असं का ?. याचं उत्तर मात्र कोणाकडेच नाही. न केंद्रातील भाजप कडे, तर न राज्यातील मविआ सरकार कडे.

सध्या जनता अंधारात वावरत आहे. विजेच्या अंधारात नव्हे, तर राज्यकर्त्यांनी आरंभिलेल्या सत्तेच्या खुर्चीसाठी झालेल्या या अंध सरकार च्या कृतीच्या अंधारात वावरत आहे. बघू या सरकार ला कधी जाग येते.

पुनश्च प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.