दैनिक सकाळ चे विचारवंत पत्रकार डॉ. डी.आर. पाटील यांनी मुकुंद पवार यांचे केले अभिनंदन
बांबवडे : कोल्हापूर जिल्हा परिषद च्यावतीने देण्यात येणारा आचार्य अत्रे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार व शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज चे संपादक मुकुंद पवार यांना मिळाल्याबद्दल दैनिक सकाळ चे विचारवंत पत्रकार डॉ. डी.आर. पाटील यांनी त्यांच्या घरी जावून बुके, शाल देवून अभिनंदन केले.


याबद्दल मुकुंद पवार यांनी त्यांचे आभार देखील मानले. डॉ. डी. आर. पाटील हे स्वत: उत्कृष्ठ पत्रकार असून, अनेक विषयांवर त्यांनी आतापर्यंत लेखन केले आहे. नुकतेच त्यांनी रत्नागिरी ते नागपूर महामार्ग या विषयांवर परखड लेखन केले आहे. यामध्ये त्यांचा अभ्यास, त्यांची माहिती संकलन ची पद्धत निश्चितच वाखाणण्यासारखी आहे.

दुसऱ्याचे अभिनंदन करताना देखील तेवढ्या मोठ्या मनाची गरज लागते. ती वृत्ती श्री पाटील सर यांच्याकडे आहे. त्यांनी केलेल्या अभिनंदनाबद्दल पुनश्च त्यांचे आभार.