दै.पुढारी च्या श्री. प्रतापसिंह जाधव यांचा वाढदिवस बांबवडे इथं संपन्न
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं दैनिक पुढारी चे संपादक मा.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा वाढदिवस युवा नेते रणवीरसिंग गायकवाड, कोल्हापूर जिल्हापरिषद बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील, सहा. पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब खुटाळे, बाजार समिती चे माजी सभापती बाबा लाड, आदी मान्यवरांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.



यावेळी बांबवडे चे ग्रा.पं.स. सुरेश नारकर, रामचंद्र शेळके, शरद बाऊचकर, विद्यानंद यादव, दत्तात्रय शेळके, दीपक साडविलकर, मुकुंद पवार, रमेश डोंगरे,संजय माने, विशाल काळे, आनंदराव केसरे, चंद्रकांत मुदुगडे, समीर पाटील, सुरज बंडगर, पोलीस पाटील संजय कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.