दै. महासत्ताचे तालुका प्रतिनिधी नथुराम डवरी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
बांबवडे : आमचे मित्र व दैनिक महासत्ता चे पत्रकार नथुराम डवरी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

नथुराम डवरी हे दैनिक महासत्ता साठी गेली पंचवीस वर्षे पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. अगदी बेताची परिस्थिती असताना सामाजिक बांधिलकीची कास त्यांनी कधी सोडली नाही. सेंट्रींग च्या कामातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी हि व्यक्ती स्वकष्टाच्या जीवावर कॉंट्रॅक्टर झाली. आज त्यांनी आपल्या आर्थिक प्रगतीत फार मोठी भरारी घेतली आहे. परंतु या व्यक्तीचे पाय आजही जमिनीवरच आहेत.

अशा आपल्या कुटुंबासह सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आमच्या या मित्रवर्यांना पुनश्च आमच्या कुटुंबाच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.