नामदेवरावांनी त्यांच्या पदाला न्याय दिला – माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर
बांबवडे : शिवसेनेचे नामदेव गिरी यांनी अल्पावधीतच आपले कार्यकर्त्यांचे मोहोळ निर्माण केले आहे. आणि या माध्यमातून त्यांनी एक वेगळी नातीगीती निर्माण केली आहेत. असें मत शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले आहे.

बांबवडे इथं शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर होते.

यावेळी खासदार पुढे म्हणाले कि, शिवसेनेमध्ये स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणारे शिवसैनिक आहेत. त्यांनी शिवसेना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविली आहे. आणि त्यापैकीच नामदेव गिरी एक आहेत. त्यामुळे त्यांचे कौतुक होणे गरजेचे आहे. सेनेन्मध्ये त्यांनी त्यांना मिळालेल्या पदाची योग्य किंमत राखली आहे.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार सत्यजित पाटील म्हणाले कि, नामदेव गिरी यांनी त्यांना मिळालेल्या पदाला न्याय दिला आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून सामान्य कुटुंबाला आधार देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांचा आम्हा सर्वांना निश्चितच अभिमान आहे.

यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.
यावेळी कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, जि.प. सदस्य हंबीरराव पाटील, उद्योगपती धनंजय पाटील, शंकर पाटील दाजी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भीमराव पाटील, संदीप पाटील सुपात्रेकर, रामचंद्र कोकाटे, बळीराम ठाणेकर, विजय लाटकर शाहुवाडी तालुका उपप्रमुख, सचिन मुडशिंगकर, पत्रकार सुखदेव गिरी, एल.वाय.पाटील चरणकर, तुषार पाटील, महिला आघाडीप्रमुख अलका भालेकर, सुवर्णा दाभोळकर, यांच्यासहित शिवसैनिक,ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.