नामदेव गिरी सहकाऱ्यांसह ऋतुजा ताई लटके यांच्या प्रचारार्थ अंधेरीत -ऋतुजा ताई लटके यांना शुभेच्छा
बांबवडे प्रतिनिधी : मुंबई येथील अंधेरी पूर्व च्या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली असून, त्या मतदारसंघात शाहुवाडी तालुक्यातील श्रीमती ऋतुजा ताई रमेश लटके या शिवसेनेतून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ शाहुवाडी तालुका व कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक शिवसैनिक गेले आहेत. यापैकी शाहुवाडी तालुक्यातील कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी यांनीदेखील आपल्या सहकाऱ्यांसोबत तेथे जावून प्रचार केला.


यावेळी बोलताना नामदेव गिरी म्हणाले कि, दिवंगत आमदार रमेश लटके हे आमच्या तालुक्यातील शेंबवणे गावचे रहिवाशी आहेत. त्यांच्या निधनामुळे एक मोठी पोकळी शिवसेनेत निर्माण झाली आहे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी ऋतुजा ताई लटके या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवीत आहेत. त्या प्रचंड मतांनी विजयी होतील यात शंका नाही,


तसेच कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी ऋतुजा ताई लटके यांना शुभेच्छा दिल्या.
नामदेव गिरी यांच्यासोबत शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, शाहुवाडी पन्हाळा विधानसभा संपर्क प्रमुख आनंदराव भेडसे, शाहुवाडी तालुकाप्रमुख दत्ता पोवार, शाहुवाडी तालुका उपप्रमुख विजय लाटकर, शिवसेनेचे कामोठे शहर प्रमुख बबन गोगावले, घणसोली शाखाप्रमुख मारुती पाटील, तसेच संदीप चव्हाण यांच्यासहित अनेक शिवसैनिक , पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.