निवडणुकीचा ज्वर चढे, “ भानामती ” मागे चाले…
बांबवडे : जसा निवडणुकीचा ज्वर वाढू लागला, तसा भानामती चा प्रकार सुरु झाला.

बांबवडे तालुका शाहुवाडी येथील विद्यानंद यादव यांच्या रेणुका मंदिर च्या मागील बाजूस हा प्रकार आज पहाटे आढळून आला.
एकवेळ श्रद्धेने माणसं जिंकता येतात. परंतु असले प्रकार समाजविघातक आहेत. यामुळे कोणीच विजय प्राप्त करू शकत नाही.


या गोष्टी नेहमीच निवडणूक दरम्यान पुढे येतात. सध्या सुरु असलेल्या जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता, असे विचित्र प्रकार सुरु झालेले पहावयास मिळत आहेत. सर्वसामान्य जनतेने अशा प्रकारांना बळी न पडता, जो उमेदवार समाज विकासाची कामे करणार असे, वाटते, त्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून द्यावे. अशा भानामती सारख्या प्रकारांनी कोण निवडून येवू शकत नाही. परंतु हा प्रकार निवडणुकी साठीच आहे. हे मात्र अद्याप नक्की नाही. त्यामुळे अशा प्रकारांना, कर्मकांडांना दूर ठेवून निर्धास्तपणे आपले मतदानाचे कर्तव्य जनतेने बजावावे, असे आवाहन आम्ही करीत आहोत.
