निष्ठेच्या रूपाने विजय पुढे येईल- माजी आम. सत्यजित पाटील सरुडकर
बांबवडे प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील शेंबवणे गावच्या सूनबाईंसाठी मतदारसंघाचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी अंधेरी पूर्व मतदारसंघात प्रचारात सहभाग घेतला. हि गोष्ट तालुक्याच्या स्वाभिमानासाठी अतिशय महत्वाची आहे. याचा निकाल ६ नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या विजयाच्या गुलालात दिसेल, असे तालुक्याचे शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले कि, शाहुवाडी तालुक्यातील शेंबवणे गावचे सुपुत्र दिवंगत रमेश लटके यांच्या निधनानंतर मुंबई तील अंधेरी पूर्व ची जागा रिक्त झाली आहे. त्या जागेवर उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानंतर लटके यांच्या पत्नी श्रीमती ऋतुजा लटके यांची उमेदवारी जाहीर झाली असून, त्यांना निवडून आणण्याचा, निष्ठावान शिवसैनिकाने चंग बांधला आहे. याच अनुषंगाने शाहुवाडी मतदारसंघाचे माजी आमदार श्री सत्यजित पाटील सरुडकर यांनी अंधेरी मतदारसंघात त्यांच्या प्रचारासाठी सहभाग घेतला.

तसेच तालुक्यातील अंधेरी स्थित असलेली जनता रमेश लटके यांना विसरणार नाही. तसेच त्यांची निष्ठा मतदानाच्या रूपाने मतपेटीत बंद होईल. जशी प्रत्येक निष्ठेची किमत आज ना उद्या होते. तशीच हि निष्ठा निवडणुकी नंतर विजयाच्या रूपाने प्रकट होईल. असे मत प्रतिपादन आमदार सत्यजित पाटील यांनी केले.

लवकरच श्रीमती ऋतुजा लटके या प्रचंड मतांनी विजय होतील, असेही श्री सत्यजित पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शाहुवाडी तालुक्याचे संपर्क प्रमुख आनंदराव भेडसे, कोल्हापूर दक्षिण चे संपर्क प्रमुख बाजीराव कळंत्रे, उद्योगपती प्रकाश पाटील, राजू नांगरे, बबन गोगावले, शाखा प्रमुख मारुती पाटील, शाहुवाडीतील शिवसैनिक प्रशांत पाटील कडवेकर, बंडू मांगरूळकर, विठ्ठल पाटील व इतर शिवसैनिक उपस्थित होते.