पंचशील मंडळ च्यावतीने महामानवांचा जयंती महोत्सव सोहळा
बांबवडे : सोनवडे तालुका शाहुवाडी इथं पंचशील तरुण मंडळ पंचशील नगर यांच्यावतीने महामानवांचा जयंती महोत्सव सोहळा दि.१२ व १३ मे रोजी संपन्न होणार आहे. अशी माहिती श्री उत्तम वाघमारे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली. तथागत भगवान गौतम बुद्ध ,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा जयंती महोत्सव संपन्न होत आहे.
दि. १२ मे रोजी महामानवांचे फोटो पूजन व दीप्प्रज्वलन सकाळी १० वाजता होणार असून,११ वाजता धम्म ध्वजारोहण व धम्मवंदना होणार आहे. रात्री १० वजता स्नेह्भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.०० वाजता महामानवांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. दि. १३ मे रोजी सकाळी धम्मवंदना तर ९.३० वाजता भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. सायंकाळी ६.०० वा. जाहीर सभा होणार असून रात्री करमणुकीचे कार्यक्रम संपन्न होणार आहेत. सदर कार्यक्रमास प्रमुख् वक्ते प्रा. प्रकाश नाईक व सुभाष वग्रे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आयु. रंगराव वाघमारे उपस्थित असणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी, तसेच आमदार दलित मित्र अशोकराव माने बापू उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक विजय घेरडे, नायब तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी मंगेश कुन्चेवर , पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, डॉ.प्रा.आनंदराव वाघमारे, डॉ. रवींद्र वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, प्रीतम वाघमारे, विक्रम वाघमारे, विद्यामंदिर सोनवडे चे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.कार्यक्रमाचे आयोजन अमर वाघमारे, श्रीकांत वाघमारे,प्रकाश वाघमारे, उत्तम वाघमारे दीपक वाघमारे, दशरथ वाघमारे,आणि सहकारी यांनी केले आहे. कार्यक्रमास युवक कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.