पत्रकारांकडून झालेला सन्मान म्हणजे, जनतेने दिलेली पोच पावती- हंबीरराव पाटील बापू
बांबवडे : पत्रकार मंडळींकडून सन्मान होणे, हे निश्चितच गौरवास्पद आहे. त्याचबरोबर आपण केलेल्या कामाची पोहोच पावती मिळणे, हे यातून सिद्ध होते. त्याचबरोबर यातून समाजकार्यासाठी नवीन उर्जा मिळते. असेच प्रेम असेल, तर पत्रकार आणि लोकप्रतिनिधी मिळून निश्चित समाजकार्यात आणखी भर पडेल, असे वक्तव्य बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील बापू यांनी केले.

शाहुवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने कोरोना संक्रमण काळात ज्या लोकप्रतिनिधींनी सर्वस्व झोकून समाजासाठी आपले कर्तव्य बजावले, अशा लोकप्रतिनिधींचा सन्मान केला. यावेळी बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील, जि.प.सदस्य विजयराव बोरगे, शाहुवाडी पंचायत समितीचे उपसभापती विजयराव खोत ,उपस्थित होते.

यावेळी बोलताना शाहुवाडी पंचायत समिती चे उपसभापती विजयराव खोत म्हणाले कि, कोरोना संक्रमण काळ खऱ्या अर्थाने परीक्षेचा काळ होता. आपल्या जवळची मंडळी जाताना पाहिले कि, वेदना काय असतात, ते कळले. परंतु या काळात खरंच समाजकार्यातून कसा आनंद मिळतो, याचा अनुभव झाला.

यावेळी पत्रकार संघाच्या वतीने डी.आर. पाटील, आनंदराव केसरे, शामराव पाटील आदी पत्रकरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जगताप यांनी केले तर आभार सुभाष बोरगे यांनी मानले.यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक मुकुंद पवार, संजय रोडे-पाटील, संतोष कुंभार, रमेश डोंगरे, सुधीर कुलकर्णी, श्रीमंत लष्कर,आदी मान्यवर पत्रकार उपस्थित होते.