पत्रकारांची लेखणी अगम्य – के.एन.लाड पापा
बांबवडे : पत्रकार समाजाचे चित्र आणि विकास घडवू शकतात, तसेच त्यांच्या लेखणी च्या माध्यमातून विकृत घटकांचे चित्र बदलवू सुद्धा शकतात. अशा पत्रकार बांधवांचे कौतुक करणे, हे आपले कर्तव्य आहे. कारण पत्रकारांची लेखणी अगम्य आहे. असे मत चरण गावाचे माजी आदर्श सरपंच श्री के.एन. लाड पापा यांनी व्यक्त केले. ते पत्रकार दिनाच्या अनुषंगाने त्यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी सर्व पत्रकारांचा शाल, डायरी व बुके देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी के.एन.लाड यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले कि,मी नेहमीच समाजातील गोर गरीब जनतेचा विचार करीत आलो आहे. इथून पुढे सुद्धा संधी मिळाल्यास एक टक्का राजकारण आणि नव्याण्णव टक्के समाजकारण करण्यास पुढे येईन. पत्रकारांनी निवडणूक उमेदवारी संदर्भात केलेल्या प्रश्नांना ते उत्तर देताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.
यावेळी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केलीत. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री रमेश डोंगरे यांनी केले. यावेळी सचिन कृष्णात लाड हे सुद्धा उपस्थित होते.

