पत्रकार पाटील यांचा सन्मान म्हणजे शाहुवाडीच्या मातीचा सन्मान-मा.आम. सत्यजित पाटील
बांबवडे : पत्रकार क्षेत्रातील जिल्हा परिषद कडून देण्यात येणारा आचार्य अत्रे पुरस्कार आपल्या तालुक्यातील दै.सकाळ चे प्रतिनिधी अमर पाटील यांना मिळाला असून, हा आपल्या शाहुवाडी च्या मातीचा सन्मान आहे. असे गौरवोद्गार मा.आमदार सत्यजित पाटील ( आबा ) यांनी काढले.
बांबवडे येथील लोकराजा अॅकॅडमी च्यावतीने पत्रकार अमर पाटील यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्री सत्यजित पाटील पुढे म्हणाले, पत्रकार क्षेत्र खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपत असतं. पत्रकारांच्या कार्याला आमचं नेहमीच सहकार्य असतं, आणि पुढे हि राहील. त्यांचा हा पुरस्कार त्यांच्या कर्तुत्वाच्या माध्यमातून मिळाला आहे. ते पत्रकारिता सोबत ग्राहक मंचाचे कार्य करतात. या अगोदर मराठा आंदोलनाच्यावेळी त्यांनी मराठा समन्वयकाची भूमिका त्यांनी यशस्वीरीत्या निभावली आहे. त्यांच्या या यशाने तालुक्याच्या मानात आणखी भर पडली आहे.
यावेळी जिल्हापरिषद चे बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील म्हणाले कि, अमर पाटील सारख्या पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. मराठा महासंघ, कोविड योद्धा अशा अनेक पदांवर भूमिका यशस्वीरीत्या निभावली आहे.
यावेळी सन्मान मूर्ती अमर पाटील म्हणाले कि, मला मिळालेला सन्मान हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा तसेच मित्र परिवारांचा सन्मान आहे. लोकांच्या अडी-अडचणी प्रशासनासमोर मांडून समाजाला त्याचा फायदा व्हावा, हि भूमिका आजवर निभावली, त्याचीच हि पोच पावती म्हणावयास हरकत नाही. माझे सर्व पत्रकार मित्र, राजकीय नेते, त्याचबरोबर व्यापारी संघटना व लोकराजा अॅकॅडमी ह्या सर्वांचाच मी आभारी आहे.
दरम्यान लोकराजा अॅकॅडमी चे एनएमएमएस च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला.
यावेळी माजी जि.प.सदस्य एन.डी. पाटील सावेकर, जि.प.सदस्य विजयराव बोरगे, शाहुवाडी पंचायत समिती च्या सभापती सुनिता पारळे, माजी उपसभापती दिलीप पाटील, बाळासाहेब खुटाळे, रवींद्र फाटक, चंद्रप्रकाश पाटील, मधुकर बुवा, जगन्नाथ जोशी, सुरेश पारळे, सुभाष बोरगे, दिग्विजय कुंभार, बाबा कदम, आर.डी.पाटील, तसेच लोकराजा अॅकॅडमी चे विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.
यावेळी लोकराजा अॅकॅडमी चे संचालक शैलेश चोरगे यांनी आभार मानले.