पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ – श्री विराज नाईक
बांबवडे : ” पत्रकार ” हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, सामान्य जनतेचा ते खऱ्या अर्थाने कैवारी असतात. म्हणूनच त्यांचे काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या ह्या कामाच्या अनुषंगाने त्यांचे कोडकौतुक करण्याचे काम विश्वास उद्योग समूह प्रती वर्षी करीत असतो. असे मत विश्वास उद्योग समूहाचे विराज नाईक यांनी व्यक्त केले.

प्रति वर्षी ६ जानेवारी रोजी ” पत्रकार दिन ” आपण साजरा करीत असतो. या अनुषंगाने पत्रकारांची एक लाख रुपयांची अपघाती विमा पॉलीसी विश्वास उद्योग समूहाच्या वतीने उतरली जाते. असेही विराज नाईक यांनी सांगितले.

विश्वास उद्योग समूहाच्या वतीने हा समारंभ लायन्स क्लब इथं संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी संचालक श्री राम पाटील उपस्थित होते.

यावेळी शिराळा, वाळवा, शाहुवाडी तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संतोष भालेकर यांनी मानले.