पत्रकार संतोष कुंभार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
बांबवडे : शाहुवाडी तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व दैनिक तरुण भारत चे पत्रकार संतोष कुंभार यांना पत्रकार संघाच्यावतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने देखील उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.


संतोष कुंभार एक मितभाषी व्यक्तिमत्व. कष्टाळूपणा आणि सामाजिक बांधिलकीचा एक उत्तम नमुना म्हणजे संतोष. उदरनिर्वाहासाठी कृषी केंद्र चालविणारी हि व्यक्ती सामाजिक धुरा सांभाळताना देखील अग्रेसर असते. एक उत्तम कवी आणि उत्कृष्ट निवेदक म्हणून त्यांची तालुक्यात ख्याती आहे.
अशा या निगर्वी व्यक्तिमत्वास सर्वच पत्रकारांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा.