पन्हाळ्यात ४२ पैकी ४१ ग्रामपंचायती जनसुराज्य शक्ती कडे
वारणानगर प्रतिनिधी : पन्हाळा तालुक्यात लागलेल्या ४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल लागला असून, ४२ पैकी ४१ ग्रामपंचायतींवर जनसुराज्य शक्ती पक्षाचा विजय झाला आहे. दरम्यान शाहुवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांनी पुन्हा एकदा या मतदारसंघावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

दरम्यान आज पन्हाळा तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतून लागलेला निकाल आमदार डॉ.कोरे यांचे वर्चस्व सिद्ध करीत आहे. परंतु शाहुवाडी मतदारसंघ हा शाहुवाडी तालुका आणि पन्हाळा तालुक्यातील काही गावे मिळून तयार झाला आहे. असे जरी असले, तरी डॉ.कोरे यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. त्यामुळे केवळ शाहुवाडी तालुक्यात सरशी मिळवून चालणार नाही, तर पन्हाळा तालुक्यात सुद्धा माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना वर्चस्व सिद्ध करावे लागणार आहे.

सध्याच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या निवडणुकांची रंगीत तालीम आहे. सध्याच्या निकालावरून दोन्ही गटाला खूप परिश्रम करावे लागणार, हे नक्की झाले आहे.