परखंदळे च्या विद्यार्थ्यांची रथातून मिरवणूक :परखंदळे विद्यामंदिर चे घवघवीत यश
बांबवडे : परखंदळे तालुका शाहुवाडी येथील विद्यामंदिर च्या बावीस विद्यार्थ्यांनी एन.एम.एम.एस.व प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून, विद्यार्थ्यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली. येथील मुख्याध्यापक भगवान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे.

एन.एम.एम.एस. परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे :

१. विशाल दळवी,२. संजीवनी दळवी,३. सुशांत यादव,४. आर्यन पिंपळे,५. प्रणिता गायकवाड,६. वैष्णवी पाटील,७. आर्यन पाटील,८. ऋषिकेश लव्हटे,९. मधुरा पाटील,१०. संग्राम पाटील,११. सौरभ पाटील,१२. अनुराधा पोवार,१३. सायली पोवार,१४. प्राजक्ता लव्हटे, १५. साधना लव्हटे,१६. प्रियांका पाटील,१७. श्रुतिका दळवी,१८. ऐश्वर्या गावडे,१९. अवंतिका पाटील,२०. श्रेया सुतार,२१. श्रावणी सुतार,२२. पायल गावडे.
या विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शक विक्रम पाटील सर, जमीर इलाई सय्यद सर, या शिक्षकांचे झाले. तसेच दिनकर पाटील सर, शिवाजी पाटील सर तसेच इतर शिक्षकांचे देखील मार्गदर्शन लाभले.

सदर प्रसंगी गावचे सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती, केंद्रप्रमुख सदाशिव थोरात, यांच्या संकल्पनेतून परखंदळे ग्रामस्थांच्या वतीने बांबवडे ते परखंदळे रथातून मिरवणूक काढण्यात आली.

याप्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ आशा उबाळे, उप गटविकास अधिकारी संदीप काटकर, गटशिक्षणाधिकारी उदय सरनाईक, गट शिक्षणाधिकारी नंदकुमार शेळके, केंद्रप्रमुख सदाशिव थोरात, सरपंच सौ. अश्विनी दळवी, उपसरपंच रमेश पिंपळे, शिक्षक समिती अध्यक्ष केशव गावडे, शिक्षण कमिटी सदस्य सुहास कोल्हापुरे, पोलीस पाटील सदाशिव सुतार, आदी मान्यवरांसह ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.