परखंदळे विद्यामंदिर चे अध्यापक भानुदास सुतार सर आदर्श पुरस्काराने सन्मानित
बांबवडे :कोल्हापूर जिल्हापरिषद च्यावतीने सन २०२४-२५ साठी देण्यात येणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात पंरखदळे गावाचे शिक्षक श्री भानुदास रामचंद्र सुतार यांना आदर्श शिक्षक या पुरस्काराने गौरविण्यात आले.
परखंदळे तालुका शाहुवाडी येथील परखंदळे विद्यामंदिर च्या सुतार सरांना आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत ,तसेच पालकवर्गाने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी शित्तूर तर्फ मलकापूर चे केंद्रप्रमुख सदाशिव थोरात, गावाचे सरपंच श्री सीताराम पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश पाटील, शिवाजी कोल्हापुरे, शिवाजी खोत, बाबुराव सुतार, अनिल दळवी, शाळेचे मुख्याध्यापक विक्रम पाटील सर, अध्यापक सचिन जाधव, मल्लिकार्जुन स्वामी, तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,ग्रामस्थ व महिला पालक वृंद सुद्धा उपस्थित होत्या.